About

आपल्या सेवेसाठी एक कार्यकर्ता

नमस्कार... मी संतोष रमेश हरपळे मी आपल्या परिसरामध्ये गेले 2012 पासून सामाजिक कामे करत आहे. या काळामध्ये मी दोन निवडणुका लढवलेल्या आहेत.

आपल्या परिसरामधील नागरिकांना दैनंदिन जीवनामध्ये ज्या अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणींवर मी अहोरात्र काम करत असतो. आपल्या परिसरामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समस्या निवारण करण्यासाठी विविध टीम आपल्या सेवेसाठी काम करत असतात.

आपल्या परिसरामध्ये स्वयंभू फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक कामे केली जातात. यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी, महिला आणि वृद्ध नागरिक यांच्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात.

आपल्या परिसरामध्ये मुख्य प्रश्न हा पाण्याचा आहे. या पाण्याच्या प्रश्नासाठी मी गेली सहा-सात वर्षांमध्ये तीव्र स्वरूपात पाच-सहा आंदोलने केली आहेत. या आंदोलनांचा फायदा असा झाला की आपल्या परिसरातील पाईपलाईन संबंधित सर्वे झाला, प्रशासन खडबडून जागे झाले आणि आपल्या पाणी प्रश्नासाठी सरकारने मुबलक निधी उपलब्ध करून दिला आहे.

येत्या काही दिवसांत पाणी प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही अहोरात्र झटत आहोत. आपल्या परिसरामध्ये ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी विविध खात्याचे मंत्री, अधिकारी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांच्या सतत संपर्कात राहून आतापर्यंत न झालेली विकासकामे लवकरच मार्गी लागतील, हा माझा विश्वास आहे.

आमच्या सहकाऱ्यांच्या नियोजनाखाली आपल्या परिसरामध्ये विविध उपक्रम राबविले जात आहेत. नागरिकांच्या प्रश्नांसाठी तीन संपर्क कार्यालये स्थापन केली आहेत, ज्यामुळे कोणतीही अडचण आल्यास त्या सहज सोडवल्या जातात आणि पुढेही तसेच केले जाईल.

आपल्या परिसरामध्ये अनेक सुविधांचा अभाव आहे. या सर्व सुविधांसाठी आम्ही एक ब्ल्यू प्रिंट तयार केलेली आहे. विकास कसा पद्धतशीर आणि नागरिककेंद्रित व्हावा यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा आराखडा बनविला आहे.

विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या सोयीसाठी विविध योजना राबविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. रस्ते, पाणी, लाईट या मूलभूत समस्यांचे निवारण करून आपल्या परिसरामध्ये सुसज्ज शासकीय दवाखाना, शासकीय शाळा, आणि नगरपरिषदेच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कायमस्वरूपी कार्यालये उभारली जाणार आहेत.

आपल्या परिसरातील सुख-सुविधेसाठी आमच्याकडे अनुभवी कार्यकर्त्यांची फळी आणि प्रशासकीय अनुभव असल्याने, येणाऱ्या नगरपरिषद कार्यकाळात सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहोत.

आजपर्यंत मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी आपल्या सेवेसाठी अनेक कामे केली आहेत. त्यातील काही ठराविक कामे खाली स्क्रोल केल्यानंतर आपण पाहू शकता.

आपलाच,
संतोष रमेश हरपळे

Santosh Ramesh Harpale Signature
Santosh Harpale

Call Us

+91 9822828409

Santosh Harpale Jansampark Karyalay

  • लक्ष्मी कमल पॅलेस पावर हाऊस फुरसुंगी, Pune-412308
  • संकेत विहार लेन नं 8 फुरसुंगी
  • संकेत विहार लेन 16 नाळे हाइट्स
  • अनुसया विश्व ढमाळवाडी फुरसुंगी

SUPPORT OUR VISION — BE A PART OF THE CHANGE